उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणे साहजिकच आहे. मात्र, यामुळे आपल्या ओठांचे मोठे नुकसान देखील होते. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात. तसेच रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी 6 इत्यादी अनेक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील ओठ फाटण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. ओठ मऊ आणि गुलाबी ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो.
तुम्ही ओठांसाठी मध वापरू शकता. त्यामुळे फाटलेल्या ओठांची समस्या दूर होते. यासाठी व्हॅसलीनमध्ये मध मिसळा आणि 10 मिनिटे ओठांवर ठेवा. यानंतर कापसाच्या बॉलने स्वच्छ करा.
फाटलेल्या ओठांसाठी तूप वापरा. हे ओठांसाठी खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यात, फाटलेल्या ओठांवर दररोज तूप लावावे. यामुळे फाटलेले ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.
फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्याचाही वापर करू शकता. यासाठी गुलाबाच्या काही पाकळ्या धुवून घ्या. या मिक्सरमध्ये बारीक करा आणि ओठांवर ती पेस्ट लावा.
फाटलेल्या ओठांसाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाब पाणी मिसळून ओठांवर लावा. फाटलेल्या ओठांची समस्या दूर होईल. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)