Teeth | या घरगुती उपायांनी दातदुखीमध्ये त्वरित आराम मिळवण्यास मदत होईल, वाचा उपाय!
कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्स करा. आता मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीत आराम मिळेल, हिरड्यांची सूज कमी होईल. काही वेळा दातांमध्ये अन्नाचे तुकडे अडकल्यानेही वेदना होतात. आपण दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकतो. लवंगाच्या तेलात रुई भिजवून दात आणि हिरड्यांवर लावा. वेदना कमी होण्यास मदत होईल.