Skin Care : उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी या सोप्या टिप्स फाॅलो करा!
शरीरात डिहायड्रेशनची समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम त्वचेवरही होतो. त्वचा कोरडी होऊ लागते. यामुळे खाज सुटणे, पुरळ उठते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर गरम पाणी प्या. तुम्ही जितके जास्त पाणी पिताल तेवढी तुमची त्वचा आणि शरीर चांगले राहण्यास मदत होईल. त्वचेवर लालसरपणा, पुरळ आणि खाज सुटल्यावर बर्फ त्वचेवर लावा. गुलाबपाणी आणि ग्रीन टीसह बर्फ बनवा. हा बर्फ चोळल्याने त्वचेच्या समस्या कमी होतील.