Hair care tips | हेअर ड्रायरने केस खराब होत आहेत? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा!
दही हे कंडिशनर म्हणून काम करते. केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी केसांवर दही आणि मधाचा मास्क लावा. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि केसांना लावा. कोरफड हे केवळ केसांसाठीच नाही तर त्वचा आणि आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचे गुणधर्म केसांचे पोषण करू शकतात. यासाठी कोरफड केसांना लावावी लागेल.