Health Tips : साखर खाण्याची सवय सोडण्यासाठी ‘या’ टिप्स उपयोगात आणा; वेगाने वजन घटणार!
वाढलेले वजन कमी करणे सोपे काम नाही. बर्याच लोकांना माहित आहे की, गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात. मात्र, तरीही अनेकजण गोड पदार्थ खातात. आहारात अधिक साखर सेवन केल्याने लठ्ठपणा, टाइप -2 मधुमेहासह इतर रोगांचा धोका वाढतो.
1 / 5

2 / 5
बऱ्याच वेळा आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मग अशावेळी आपण साखरऐवजी गूळ, स्टीव्हिया किंवा पाम कँडी सारखे निरोगी पर्याय खाल्ले पाहिजेत. या गोष्टी शरीरासाठी फायदेशीर असतात.
3 / 5
मध, गूळ, सिरप, पाम, नारळ साखरे गोड पदार्थ आपण आहारात घेऊ शकतो. याचे सेवन केल्याने साखरेची तल्लफ कमी होते. वरील हे पदार्थ खाल्याने वजन देखील वाढत नाही.
4 / 5
आपण चव वाढविण्यासाठी आपल्या आहारात सफरचंद, चेरी, बेरी, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि संत्रीचा समावेश करू शकता. तथापि, या फळांमध्ये आवश्यक पोषक आणि नैसर्गिक साखर भरपूर आहे. या गोष्टी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
5 / 5
मनुका, खजूर, अंजीर हे फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. याव्यतिरिक्त, ते आवश्यक पौष्टिक पदार्थांनी समृद्ध आहेत जे आपल्या शरीरास पोषण देतात. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये आपण या गोष्टी समाविष्ट करू शकता. यामुळे वजन देखील वाढत नाही.