Skin Care : हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!
हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्वचा कोरडी होण्यापासून वाचवण्यासाठी आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेलामध्ये थोडे पाणी मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे.