Lips Care Tips : सुंदर आणि मऊ ओठ मिळवण्यासाठी या टिप्स नक्कीच फॉलो करा!
तुमचे ओठ सुंदर बनवण्यासाठी आतून हायड्रेट राहणे खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्याने त्वचेच्या समस्याही दूर राहतात. तज्ञांच्या मते, तुम्ही दररोज सुमारे 3 लिटर पाणी प्यावे. जास्त पाणी पिल्यामुळे ओठ मुलायमदार राहण्यास मदत होते. बऱ्याच लोकांच्या ओठांवर काळे डाग तयार होतात. तज्ज्ञांच्या मते, कॉफी, चहा आणि वाइनसारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात. यामुळे हे काळे डाग टाळण्यासाठी तुम्ही स्ट्रॉची मदत घेऊ शकता.