रोज रात्री झोपताना नाभीला मोहरीचे तेल लावा. ही खूप जुनी पध्दत आहे. नाभीला तेल लावल्याने फाटलेल्या ओठांची समस्या दूर होऊन ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
गुलाबाची पाने बारीक करून त्यात लिंबू आणि मध मिसळा. झोपताना ओठांवर लावा. काही दिवसात फाटलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
व्हॅसलीनमध्ये थोडे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि रोज रात्री झोपताना ओठांवर लावा. यामुळे तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या तर दूर होईल.
हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. पाण्याअभावीही ओठ उलले जातात. ही समस्या टाळण्यासाठी दररोज जास्त प्रमाणात भरपूर प्या. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)