Skin Care : प्रसूतीनंतर त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. परंतु ही अनुभूती स्त्रीसाठी मानसिक आनंदासोबतच शारीरिक समस्याही घेऊन येते. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, त्यामुळे त्वचेच्या समस्या जसे मुरुम, काळी वर्तुळे, पिगमेंटेशन वाढतात.
1 / 5
आई होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. परंतु ही अनुभूती स्त्रीसाठी मानसिक आनंदासोबतच शारीरिक समस्याही घेऊन येते. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, त्यामुळे त्वचेच्या समस्या जसे मुरुम, काळी वर्तुळे, पिगमेंटेशन वाढतात. गरोदरपणानंतर महिलांनी या खालील खास टिप्स फाॅलो कराव्यात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2 / 5
त्वचेची अतिरिक्त काळजी घ्या. यासाठी हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही बाहेर उन्हात जाल तेव्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका. याशिवाय चेहऱ्याला रूमाल बांधा.
3 / 5
डिलिव्हरीनंतर केमिकलयुक्त पदार्थांपासून दूर राहा. घरगुती उपाय करा. डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही रात्री झोपताना बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावू शकता. त्याचप्रमाणे, चेहऱ्याच्या इतर समस्यांसाठी तुम्ही होम फेस पॅक देखील वापरू शकता.
4 / 5
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी घेणे सर्वात महत्वाचे आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे भरपूर पाणी प्या. दिवसातून किमान सात ते आठ ग्लास तरी पाणी पिले पाहिजे.
5 / 5
प्रसूतीनंतर महिलेला पुरेशी झोप मिळत नाही. ज्यामुळे काळी वर्तुळे सारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत महिलेने वेळेच नियोजन केले पाहिजे. जेव्हा जेव्हा तुमचे मूल झोपते, तेव्हा तुम्ही देखील झोपायला हवे.