गाडीच्या दोन्ही बाजूस कापसा सारखा बर्फ, निर्सगाची उधळण असे चित्र कोणाला पाहायला आवडणार नाही. अशा थंडीमध्ये सर्वच जण बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतात . चला तर मग जाणून घेऊयात या सिजनमध्ये तुम्ही कुठे फिरायला जावू शकता.
जम्मु काश्मीर मधील गुलमर्ग आणि श्रीनगरची रोड ट्रिप तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल. या प्रदेशातील प्रत्येक रोड बर्फाने व्यापलेला असतो. हे दृश्य पाहून स्वर्गाचीच जाणीव तुम्हाला होईल. गुलमर्ग ते श्रीनगर 50 किमी चा हा रोड तुमचा ट्रिप स्मरणीय करेल.
हिवाळ्यात पर्यटन करण्यासाठी कुल्लू हा देखील उत्तम पर्याय असू शकतो. इथली सुंदर दृश्ये तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतील. इथल्या मनमोहक निर्सगातस तुम्ही हरवून जाल.
चहाच्या मळ्यात वसलेले दार्जिलिंग हे शहर तुम्हाला एका वेगळीच अनुभूती देईल. या मळ्यांमध्ये तुम्ही चहाची संपूर्ण प्रक्रिया पाहू शकता. या ठिकाणी पेलिंग आणि दार्जिलिंग असा 100 किमी अंतर आहे. या रस्त्यावरुन जाताना निर्सगाचे एक वेगळेच रुप पाहायला मिळेल.
प्रत्येक पर्यटकाच्या बकेट लिस्टमध्ये कुल्लू ते मनाली ही रोड ट्रिप नक्की असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाने भरलेली सुंदर दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात.
ऋषिकेश हा सुद्धा सहलीसाठी उत्तम पर्याय आहे. येथील निर्सगाची मोहीनी तुम्हाला पडली नाही तरच नवल. या सुट्यामध्ये या ठिकानांना नक्की भेट द्या