प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे याशिवाय शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायबरचीही गरज असते. फायबरच्या कमतरतेमुळे केवळ पोटच नाही तर आरोग्याशी संबंधित इतर समस्या देखील होऊ शकतात. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारामध्ये फायबरचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे.
जर शरीरात फायबरची कमतरता असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास निर्माण होऊ शकतो. पोट साफ न झाल्यास गॅस, अॅसिडिटी होऊ लागते. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक दिवस राहिल्यास मूळव्याध होतो. यामुळे आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. पचनसंस्थेतील अडथळ्यांमुळे अन्न पचत नाही आणि हळूहळू वजन वाढू लागते. यामुळे झपाट्याने आपले वजन वाढण्यास सुरूवात होते.
आहारात फायबर नसल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि चरबी जमा होऊ लागते. या फॅट बेडमुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागते. यामुळेच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.
पचनसंस्थेवरील भार वाढल्यामुळे शरीरातील बहुतांश ऊर्जा अन्न पचवण्यात वाया जाते. पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी आणि इतर फायबर युक्त गोष्टी खा, यामुळे आपले पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.