उन्हाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवणे खूप जास्त महत्वाचे असते. उष्णतेमुळे काहींना जीव गमवावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, शरीराचे तापमान अचानक वाढले की सनबर्न होतो. उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. यामुळे या हंगामामध्ये आपल्या आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते.
चक्कर येणे, डोळ्यांमध्ये चणचण, कोरडे ओठ, कोरडी जीभ, डोकेदुखी, अत्यंत थकवा, मळमळ ही प्रामुख्याने उष्माघाताची लक्षणे आहेत. जर वरील ही लक्षणे दिसत असतील तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चांगल्या आरोग्यासाठी ताक पिणे अत्यंत महत्वाचे आहे. ताक आपली तहान भागवण्यासोबतच आपले शरीर थंड ठेवण्यासही मदत करते.
उन्हाळ्यात नेहमी सैल असणारे हलके सुती कपडे घाला. त्यामुळे शरीर पुरेसे थंड राहते. व्यायाम करतानाही काही टिप्स फाॅलो करा. व्यायाम करताना पाणी सतत पिण्याचा प्रयत्न करा.
या हंगामामध्ये हायड्रेटेड राहण्यासाठी सतत पाणी प्या. तसेच पाण्यामध्ये नारळ पाणी आणि विविध फळांचे ज्यूस देखील आहारामध्ये घ्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.