Health care tips : वजन कमी करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध अंडी हे निरोगी चरबीचा स्रोत आहे. निरोगी राहण्यासाठी रोज दोन अंडी खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. हे प्रौढ आणि मुले दोघेही सेवन करू शकतात, परंतु अंडी ही नेहमीच उकळून खाणे अधिक फायेदशीर ठरते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन आवश्यक मानले जाते.
1 / 5
कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध अंडी हे निरोगी चरबीचा स्रोत आहे. निरोगी राहण्यासाठी रोज दोन अंडी खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. हे प्रौढ आणि मुले दोघेही सेवन करू शकतात, परंतु अंडी ही नेहमीच उकळून खाणे अधिक फायेदशीर ठरते.
2 / 5
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन आवश्यक मानले जाते. बीन्स ही अशीच एक हिरवी भाजी आहे, ज्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. निरोगी चरबीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो, बीन्सच्या शेंग्यांची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो.
3 / 5
चरबीमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते आणि अशा स्थितीत एके दिवशी आपल्याला हृदयविकारांचा सामना करावा लागतो. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये कमी तेलाचा वापर करा.
4 / 5
संशोधनात असे समोर आले आहे की डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील हेल्दी फॅट भरून काढता येते. त्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे घटकही असतात. यामुळे आपल्या आहारामध्ये डार्क चाॅकलेटचा समावेश केला जाऊ शकतो.
5 / 5
निरोगी चरबीच्या स्त्रोतांचा विचार केला जातो, तेव्हा मासे कसे विसरू शकतात. निरोगी चरबी व्यतिरिक्त ओमेगा -3 फॅटी ऍसिड, सॅल्मन, हेरिंग आणि सार्डिन सारखे महत्वाचे पोषक देखील त्यात असतात. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर त्याला तुमच्या आहाराचा भाग नक्की बनवा.