Health Care : वर्क फ्रॉम होम करत आहात? आरोग्य बिघडलंय मग आहारामध्ये या खास पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा!
कोरोनाच्या काळात जास्त करून कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना दिले. बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. घरून काम करण्याचे काही फायदे असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. कारण आॅफिसमध्ये काम करताना आपल्या शरीराची हालचाल होते.
1 / 5
कोरोनाच्या काळात जास्त करून कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना दिले. बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. घरून काम करण्याचे काही फायदे असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. कारण आॅफिसमध्ये काम करताना आपल्या शरीराची हालचाल होते. मात्र, जेंव्हा आपण वर्क फ्रॉम होम करतो. त्यावेळी शरीराची हालचाल कमी होते आणि आपण जास्त जेवण देखील करतो. वर्क फ्रॉम होम करताना निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये काही निरोगी पदार्थांचा समावेश करायला हवा.
2 / 5
वर्क फ्रॉम होम करताना दुपारच्या जेवणामध्ये दही खाल्ल्ये पाहिजे. पचनसंस्थेला चांगली ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये असलेले बॅक्टेरिया पचनक्रिया मजबूत करतात. चविष्ट असल्याने मुलांनाही ते खायला आवडते. हिवाळ्यात हंगामात रात्री किंवा सकाळी दही खाण्यापेक्षा दुपारी नेहमी दही खावे.
3 / 5
बीटमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम शरीरातील अन्न पचवण्यास मदत करतात. यासोबतच बीट इतर अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवते. जर तुम्हाला याचा आहारात समावेश करायचा असेल तर तुम्ही ते सॅलडच्या स्वरूपात किंवा त्याचा रस देखील घेऊ शकता.
4 / 5
दिवसातून एकदा ओट्स किंवा दलिया नक्की खा. हे खूप हलके आहे आणि त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. निरोगी पचनसंस्थेसाठी फायबर चांगले असते. जर तुम्हाला ओट्स दलिया आणखी हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही ते बनवताना त्यात गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश करू शकता.
5 / 5
वर्क फ्रॉम होम करताना आपल्या दररोजच्या आहारामध्ये मखानाचा देखील समावेश करा. मखाना खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय मखानामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते. मखाना चविसाठी अत्यंत स्वादिष्ट असतो.