Health Tips | व्यायाम-आहार-फळांचे सेवन, शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी 5 टिप्स
निरोगी आहार शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करू शकतो. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ, व्हिटामिन सी आणि प्रथिने यांचा आपल्या आहारात समावेश करा.
1 / 6
निरोगी आहार शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करू शकतो. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी लोहयुक्त पदार्थ, व्हिटामिन सी आणि प्रथिने यांचा आपल्या आहारात समावेश करा.
2 / 6
जेवणात अधिक अंतर टाळा : जेवणा-खाण्या दरम्यान 2-3 तासांचे अंतर ठेवा. कारण जास्त अंतराने लोहाचे शोषण कमी होते. चहा, कॉफी, तळलेले खाद्यपदार्थ, सिगारेट किंवा तंबाखूने आपली भूक भागवू नका. दररोज व्यायाम केल्याने शरीरातील लाल रक्तपेशी देखील वाढतात.
3 / 6
कडधान्ये भिजवून, अंकुर काढून शिजवणे : डाळी-कडधान्ये प्रथिने, खनिजे आणि पोषक तत्वांचा स्रोत आहेत. पोषक घटकांचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांना रात्रभर भिजवा आणि व्यवस्थित मोड आल्यानंतर त्यांना आवश्यक तसे शिजवा.
4 / 6
आवळा खा : हिमोग्लोबिनच्या पातळीसाठी व्हिटामिन सीचे प्रमाण महत्वाचे आहे. मात्र, अशावेळी आवळा युक्त गोळ्यांचे सेवन टाळा. त्याऐवजी आवळा किंवा त्याचे लोणचे अथवा मुरंबा खा.
5 / 6
हिरव्या भाज्या खा : मेथी, पालक, केल इत्यादी हिरव्या भाज्यांमध्ये लोह अधिक प्रमाणात असते. हे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. आहारात हंगामी असलेल्या हिरव्या भाज्यांची निवड करा.
6 / 6
बीटाचा रस प्या : सलाद म्हणून बीटरूट खा किंवा त्याचा रस प्या. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास भरपूर मदत होते.