Holi 2022: रंगाची अॅलर्जी आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा आणि बिनधास्त खेळा होळी!
खोबरेल तेलामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची काळजी घेतात. त्वचेवरील लालसरपणा, अॅलर्जी आणि जळजळ दूर करण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतरही अॅलर्जी असल्यास बाधित भागावर खोबरेल तेल लावावे. कोरफड जेल देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रंग खेळण्याच्या अगोदर आपल्या त्वचेला कोरफड जेल लावा.