उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जर आपल्याला निरोगी राहिचे असेल तर सकस आहार अत्यंत महत्वाचा आहे. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकस पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आहारात भरपूर पाणी असलेले पदार्थ समाविष्ट करून आपण स्वत: ला निरोगी ठेऊ शकतो. ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात.
उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये कलिंगड, काकडी आणि पुदिना, दही इत्यादी सुपरफूड समाविष्ट करू शकता. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता.
दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते आतडे निरोगी ठेवण्याचे काम करतात, उन्हाळ्यात दह्यापासून बनवलेली लस्सी आणि ताक यांचा आहारामध्ये समावेश करा. दही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.
नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ते शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते, दररोज एक ग्लास नारळाचे पाणी प्या. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
कलिंगडमुळे शरीर हायड्रेटेड राहते, शरीराला थंड ठेवण्याचे काम कलिंगड करते. यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. कलिंगडमध्ये काळी मिरी, मीठ आणि चाट मसाला टाकूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकता.