बटाट्याचे विविध पदार्थ खायला जवळपास सर्वांनाच आवडते. तुम्ही बटाटे वापरून खुसखुशीत चाट बनवू शकता, ते खूप चवदार असते. तुम्ही बटाटे आणि काही मसाले वापरून ही चाट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या खास बटाटे चाटचे रेसिपी.
4 उकडलेले बटाटे, हिरवी मिरची,1 टीस्पून चाट मसाला, 2 चमचे लसूण, आवश्यकतेनुसार मीठ, 2 चमचे डाळिंबाचे दाणे, 1 टीबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 2 चमचे सेव, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर इत्यादी साहित्य आपल्याला बटाटे चाट तयार करण्यासाठी लागणार आहे.
क्रिस्पी आलू चाट तयार करण्यासाठी बटाटे हलके तळून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या, नंतर त्यात बटाटे घालून हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.
चाटमध्ये लाल तिखट, कैरी पावडर, धनेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा. चाट एका भांड्यात काढा, त्यावर डाळिंब, कोथिंबीर, शेव आणि लसूण चटणीने सजवा आणि सर्व्ह करा.
ही खास चाट आपण कोणी पाहुणे घरी आले की, तयार करू शकतो. कारण याला वेळ अगदी कमी लागतो. लहान मुलांना तर ही बटाटा चाट नक्की खूप आवडेल.