Jaggery Tea : चहाचे शौकीन असाल तर हिवाळ्यात ‘हा’ खास गुळाचा चहा प्या आणि निरोगी राहा!
गूळ हा मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे B1, B6, C चा उत्कृष्ट स्रोत आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि झिंक, सेलेनियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि चयापचय गती वाढण्यास मदत होते. आरोग्यदायी पर्याय म्हणून तुम्ही साखरेऐवजी गुळाचे सेवन करू शकता.