तांदूळ आणि डाळीमध्ये जेवढी पोषक द्रव्ये असतात तेवढी इतर कोणत्याही अन्नात आढळत नाही. मात्र, ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये डाळींचा समावेश करायला हवा.
डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. त्यासोबत मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे कडधान्ये सहज पचतात आणि पोट जास्त काळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी मुगडाळ फायदेशीर आहे.
200 ग्रॅम डाळीमध्ये 212 ग्रॅम कॅलरीज, 0.8 ग्रॅम फॅट, 14.2 ग्रॅम प्रथिने, 36.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 15.4 ग्रॅम फायबर असते.
डाळीतील प्रथिने आपल्याला स्नायू तयार करण्यास मदत करतात. सोबत डाळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, पोट साफ राहते.
डाळीमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे आहारामध्ये डाळींचे सेवन केल्याने त्वचा देखील चांगली राहते.