Weight Loss : चयापचय वाढवण्यासाठी आहारात ‘या’ 3 पेयांचा समावेश करा!
वजन कमी करताना आपल्याला व्यायाम, डाएट आणि आपण काय खात आहोत याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशावेळी आपण व्यायामासोबतच काही आरोग्यदायी पेयांचाही आहारात समावेश केला पाहिजे. या पेयांचे सेवन केल्याने चयापचय वाढण्यासही मदत होते.
1 / 4

2 / 4
चयापचय वाढण्यासाठी आले, लिंबू आणि मध फायदेशीर आहे. हे पेय तयार करण्यासाठी आल्याचा एक तुकडा, दोन चमचे लिंबाचा रस आणि मध एक चमचा घ्या. त्यानंतर हे सर्व एक ग्लास पाण्यात मिक्स करा. वीस मिनिटे मंद गॅसवर राहूद्या. त्यानंतर गरम असताना प्या.
3 / 4
दालचिनी, जिरे आणि काळी मिरी यांचे पेय देखील वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी 3 चमचे जिरे, 2 दालचिनी, 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबू लागेल. पेय तयार करण्यासाठी सर्व घटक एकत्र मिक्स करा आणि एक ग्लास पाणी टाकून वीस मिनिटे उकळा आणि प्या.
4 / 4
ग्रीन टी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी खूप मदत करते. दररोज सकाळी उपाशी पोटी आपण ग्रीन टीचे सेवन केले पाहिजे. ज्यामुळे पोटावरील चरबी जाण्यास मदत होते.