Health | या आरोग्यदायी पेयांमुळे उन्हाळ्यात साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, जाणून घ्या याबद्दल!
गिलोयचा रस मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, ते साखर नियंत्रित करण्यास मदत करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. यामुळे या हंगामात गिलोयच्या रसाचा आहारात नक्कीच समावेश करा. मधुमेहाच्या रूग्णांनी दुपारच्या वेळी लिंबू पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मात्र, फक्त लिंबू आणि पाणीच सेवन करा. बरेच लोक लिंबू पाणी म्हटंले की, लगेचच साखर पण टाकतात मात्र असे अजिबात करू नका.