Breakfast : निरोगी राहण्यासाठी या 4 आरोग्यदायी स्नॅक्सने करा दिवसाची सुरुवात!
आपला सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण यामुळे आपल्याला संपूर्ण दिवसाची ऊर्जा मिळते. नाश्ता वगळल्याने वजन कमी होत नाही. उलट त्यामुळे अधिक शारीरिक समस्या निर्माण होतात. नेहमी 10 वाजेपर्यंत नाश्ता करा. नाश्त्यामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे आपण आज बघणार आहोत.
1 / 5

2 / 5
सकाळच्या नाश्त्यामध्ये निरोगी पदार्थांमध्ये पोहे देखील येतात. पोहे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. शिवाय पोह्यामुळे आपले पोट बऱ्याच वेळ भरलेले राहते. यामुळे वजनही कमी होण्यास मदत होते.
3 / 5
सकाळच्या नाश्त्यामध्ये इडली खाणे देखील फायदेशीर आहे. इडली, सांबर आणि नारळ्याच्या चटणीमध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
4 / 5
उपमा हा देखील नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे. उपमा तयार करताना नेहमी तुपाचा वापर केला पाहिजे.
5 / 5
मुगाच्या डाळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. सकाळच्या नाश्त्यासाठी आपण मुगदाळीचे घावण तयार केला पाहिजे. हे आरोग्यासाठी चांगला नाश्ता आहे.