Health Care : उन्हाळ्यात घराबाहेर जाताना हे पदार्थ सोबत ठेवा आणि डिहायड्रेशन समस्या टाळा!
द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा. जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे.