बऱ्याच वेळा आपण वेळेवर आणि व्यवस्थित जेवण करत नाहीत. तसेच हिवाळ्याच्या हंगामात बाहेर खूप थंडी असल्यामुळे आपण बाहेर जाणे देखील टाळतो. यामुळे आपल्या शारीरिक हालचाली देखील खूप कमी होतात. हिवाळ्याच्या हंगामामध्ये आपण दररोज सकाळी व्यायाम करायला हवा. यामुळे पचनास मदत होते.
संपूर्ण हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आहारात कडधान्यांचा समावेश करा. मका, बाजरी, ओट्स यांसारखे धान्य सर्व ऋतूंमध्ये शरीराला उबदार ठेवतात.
हिवाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये गुळाचा समावेश नक्की करा. गुळामुळे आपल्या पचन समस्या दूर होण्यास मदत होते.
हिवाळ्यामध्ये दररोजच्या आहारामध्ये तिळाचा देखील समावेश करा. तीळ आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. या हंगामात तुम्ही तिळाचे लाडू देखील खाऊ शकता.
सर्दीपासून बचाव करण्यासाठी आल्याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. दररोज आल्याचा चहा प्या. यामुळे थंडीमध्ये देखील आराम मिळेल. (टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)