उन्हाळाची चाहूल आता लागली आहे. उष्णतेमुळे लाही लाही होण्यास सुरूवात झाली आहे. उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे पाहिला मिळते आहे. या हंगामात आरोग्याची अधिक काळजी घेणे आता महत्वाचे झाले आहे. या हंगामात काही खास पेयांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे शरीरात पाण्याची कमी होणार नाही.
ग्रीन टी बनवा आणि लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
कापलेल्या काकडी आणि लिंबू पाण्याच्या बाटलीत 6 तास भिजत ठेवा. हे पाणी घराबाहेर पडताना प्या. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होईल. विशेष म्हणजे हे उन्हाळ्याच्या हंगामात पिणे अधिक फायदेशीर आहे.
सब्जाच्या बिया फ्रिजमध्ये नारळाच्या पाण्यात भिजवा. आता त्यात गूळ पावडर मिसळा आणि प्या. हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगड खाणे फायदेशीर आहे. कलिंगडाच्या रसामध्ये पुदिन्याची काही पाने मिक्स करी आणि प्या.