Health | गरोदरपणात नेमके काय खावे कन्फ्यूज आहात? मग ही खास बातमी एकदा वाचाच!
आपल्याकडे एखादी महिला ज्यावेळी गर्भवती राहते. तेंव्हा तिला अनेक गोष्टींचे सेवन करण्यापासून रोखले जाते. मात्र, तिच्या आरोग्यासाठी नेमके काय फायदेशीर आहे, हे त्या महिलेलाच माहिती नसते. आज आपण जाणून घेणार आहोत की, गर्भवती महिलांनी नेमक्या कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. ज्यामुळे गर्भवती महिला आणि तिचे बाळ तंदुरूस्त राहण्यास मदत होईल.
1 / 10
एका महिलेसाठी आई होणे हा सर्वात मोठा आनंद असतो. त्यामध्येही पहिल्यांदा गर्भवती राहिल्यानंतर महिलांना अनेक आरोग्य समस्यांमधून जावे लागते. विशेष: खाण्या-पिण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. काय खाणे आणि काये नाही यामध्ये नेहमीच संभ्रम निर्माण होतो.
2 / 10
आपल्याकडे एखादी महिला ज्यावेळी गर्भवती राहते. तेंव्हा तिला अनेक गोष्टींचे सेवन करण्यापासून रोखले जाते. मात्र, तिच्या आरोग्यासाठी नेमके काय फायदेशीर आहे, हे त्या महिलेलाच माहिती नसते.
3 / 10
आज आपण जाणून घेणार आहोत की, गर्भवती महिलांनी नेमक्या कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. ज्यामुळे गर्भवती महिला आणि तिचे बाळ तंदुरूस्त राहण्यास मदत होईल.
4 / 10
अॅव्होकॅडो खाणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. कारण त्यामध्ये के, बी, ई, सी हे जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळेच गर्भवती महिलेने अॅव्होकॅडोचे सेवन करायला हवे.
5 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे शरीराला अनेक घटक मिळतात.
6 / 10
गरोदरपणात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी महिलांनी दिवसातून किमान एक वेळातरी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. ते लोह आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने निरोगी राहण्यास मदत होते.
7 / 10
आईची हाडे तसेच पोटात वाढणाऱ्या मुलाची हाडे मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असलेल्या गोष्टी खाणे खूप गरजेचे आहे.
8 / 10
गर्भवती महिलांनी आहारामध्ये जास्तीत-जास्त दूध, दही, ताक आणि चीजचा समावेश करावा. यामुळे शरीरातील कॅल्शियमची समस्या दूर होण्यास मदत होते.
9 / 10
गर्भवती महिलेच्या बाळाच्या विकासासाठी डाळीतील प्रथिने अत्यंत महत्त्वाची असतात. शरीरात प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही डाळींचे सेवन करू शकता. प्रथिनाशिवाय त्यात फॉलिक अॅसिड, फायबर आणि कॅल्शियम असते.
10 / 10
डाळींचा आपण आहारामध्ये अनेक प्रकारे समावेश करू शकतो. तसेच गर्भवती महिलांनी सध्याच्या हंगामामध्ये ताकाचा देखील मसावेश करावा. यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.