Winter Superfoods : हिवाळ्यात ‘या’ सुपरफूड्सचा आहारात नक्की समावेश करा आणि निरोगी राहा!
हिवाळ्यात सांधेदुखी, वजन वाढणे, खोकला, सर्दी अशा अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय, कोरोनाच्या काळात जास्त बाहेर न पडल्यामुळे कमी शारीरिक हालचाली होत आहेत. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरीही काही योगासने आणि व्यायाम करू शकता.
1 / 5
हिवाळ्यात सांधेदुखी, वजन वाढणे, खोकला, सर्दी अशा अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय, कोरोनाच्या काळात जास्त बाहेर न पडल्यामुळे कमी शारीरिक हालचाली होत आहेत. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरीही काही योगासने आणि व्यायाम करू शकता. तसेच आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून निरोगी राहू शकता. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल जाणून घेऊयात.
2 / 5
बाजरीमध्ये व्हिटॅमिन बी6, झिंक आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे तुमच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर आहे. हे केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. तुम्ही तांदूळ, क्विनोआ आणि इतर धान्यांच्या जागी बाजरी देखील वापरू शकता.
3 / 5
हिवाळ्यात तुम्ही अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता. यातील काही भाज्यांमध्ये तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता वाढवतात. जसे की पालक, मेथी, मोहरी, पुदिना या भाज्यांमध्ये भरपूर पोषक, जीवनसत्त्वे, फायबर असतात.
4 / 5
तिळामध्ये फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन ई समृध्द असतात. ते तुमच्या हाडे, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात तिळाचे लाडू खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच नाश्त्यामध्ये देखील आपण तिळाचा समावेश करू शकता.
5 / 5
हिवाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये हंगामी फळांचा समावेश करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.