आपल्यापैकी बहुतेक लोकांना असे वाटते की, सर्दी आणि खोकला या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर आहेत. हिवाळ्याच्या हंगामात सर्दी आणि खोकल्याच्या समस्येमध्ये मोठी वाढ होते. आपल्या घरामध्ये असे अनेक पदार्थ आहेत. ज्याचा वापर करू आपण सर्दी, ताप आणि खोकला या समस्या दूर करू शकतो.
सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी आपण आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे, 9-10 तुळशीची पाने, एक चिमूटभर हळद, ग्रीन टी1 चमचे, एक ग्लास पाणी घ्या.
वरील सर्व घटक एकत्र मिक्स करा. त्यानंतर वीस मिनिटे हे मंद आचेवर गरम करा. त्यानंतर प्या. दररोज सकाळी हे खास पेय घेतल्याने सर्दी, ताप आणि खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
आले आणि हळद या दोन्ही घटकांमध्ये मजबूत दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते केवळ व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढत नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.