खोबरेल तेल आणि गुलाबी मीठ चांगले मिसळा. आता ते 30 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. कोरडे झाल्यावर फेसवॉश आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.
विशेष म्हणजे ही पेस्ट आपण शरीराच्या इतरही भागांना लावू शकतो. या खास बॉडी स्क्रबमुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
तांदळाचे पीठ आणि गुलाब पाणी मिक्स करून आपल्याला बॉडी स्क्रब तयार करता येतो. हा बॉडी स्क्रब त्वचेवरून काळपटपणा दूर करतो.
टोमॅटो, मुलतानी माती आणि खोबरेल तेल मिक्स करून बॉडी स्क्रब तयार करा. यामुळे त्वचेची चमक वाढण्यास मदत होते.