Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनच्या निमित्ताने हे गोड पदार्थ घरी तयार करा!
नारळाचे लाडू हा सर्वात सोप्पा गोड पदार्थ आहे. ते तयार करण्यासाठी फक्त दोन मुख्य घटक आवश्यक आहेत. किसलेले नारळ आणि कंडेन्स्ड दूध, हे दोन्ही एका वाडग्यात टाकावे आणि कणीक तयार होईपर्यंत मिक्स करावे. याच्या सहाय्याने तुम्ही लहान लाडू तयार करून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
1 / 5
नारळाचे लाडू - हा सर्वात सोप्पा गोड पदार्थ आहे. ते तयार करण्यासाठी फक्त दोन मुख्य घटक आवश्यक आहेत. किसलेले नारळ आणि कंडेन्स्ड दूध, हे दोन्ही एका वाडग्यात टाकावे आणि कणीक तयार होईपर्यंत मिक्स करावे. याच्या सहाय्याने तुम्ही लहान लाडू तयार करून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
2 / 5
सेवयांची खीर - सेवई खीर तांदळाच्या खीर सारखीच आहे. तांदळाऐवजी त्यात शेवया घाला. या शेवयासाठी दुध, साखर आणि सुका मेवा आवश्यक आहे. ही खास खीर तयार करण्यासाठी 20 मिनिटे लागतात. ही एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.
3 / 5
सूजी हलवा - ही स्वादिष्ट रेसिपी रव्यापासून तयार केली जाते. ते तयार करण्यासाठी रवा, साखर, तूप आणि ड्राय फ्रूट्सचा वापर केला जातो. ही एक अशी मिठाई आहे, जी तुमच्या तोंडाला पाणी आणू शकते. ते बनवण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो. चवीसाठी तुम्ही त्यात वेलची वापरू शकता.
4 / 5
दुधाचा पेडा - दुधाचा पेडा नारळाच्या लाडूसारखाच आहे. फरक एवढाच आहे की, दुधाच्या पेडयामध्ये खोबऱ्याऐवजी खवा वापरून बनवला जातो. हे स्वादिष्ट पेडे बनवणे सोपे आणि स्वादिष्ट आहेत. चवीसाठी तुम्ही ड्राय फ्रूट्स आणि वेलची पावडर घालू शकता.
5 / 5
बेसन लाडू - बेसन लाडू सर्वात जास्त आवडीने खाल्ल्ये जातात. हे लाडू बेसन, चूर्ण साखर आणि तुपापासून बनवले जातात. ते तयार करण्यासाठी 20 मिनिटे लागतात. हे बनवण्यासाठी आधी बेसनाची पेस्ट बनवा, नंतर त्यात चूर्ण साखर घालून चांगले मिक्स करा. त्यात सुकामेवा घालून छोटे लाडू बनवा.