Skin | तुमच्या त्वचेसाठी दूध हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही, त्वचा सुंदर हवीये? मग हे करा!
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे थोडे जरी उन्हात गेले तरीही त्वचा लगेचच लाल होते. जर तुम्हालाही समस्या असेल तर दूध चेहऱ्याला लावा. कच्चे दूध त्वचेला लावले तर ते त्वचेला अतिनील किरणांच्या प्रभावापासून वाचवण्याचे काम करते. दूध आपल्या त्वचेमधील जळजळ कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. कच्चे दूध त्वचेला लावा आणि एक तास ठेवा.
1 / 10
दूध आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दुधाच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम दूध करते.
2 / 10
दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेचे पोषण करते आणि आतून निरोगी बनवते. दूध त्वचेवर लावल्यास त्वचा हायड्रेट राहते, डाग दूर होतात. आणि त्वचेच्या इतर अनेक समस्यांवरही मात करण्यास मदत होते.
3 / 10
चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायच्या असतील आणि वृद्धत्वाचा परिणाम टाळायचा असेल, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी तोंड स्वच्छ धुतल्यानंतर आपल्या चेहऱ्याला दूध लावा.
4 / 10
दुधामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते आणि आपली त्वचा घट्ट होण्यास मदत होते. मात्र, कधीही चेहऱ्याला दूध लावू बाहेर जाऊ नका. त्यामुळे चेहऱ्यावर धुळ बसू शकते.
5 / 10
मुरूमाची समस्या दूर करण्यासाठीही दूध खूप जास्त फायदेशीर ठरते. दुधामध्ये लैक्टिक ऍसिड असते, जे त्वचेतील घाण खोलवर साफ करते. यामुळेच दुध त्वचेला लावा.
6 / 10
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक म्हणजे थोडे जरी उन्हात गेले तरीही त्वचा लगेचच लाल होते. जर तुम्हालाही समस्या असेल तर दूध चेहऱ्याला लावा.
7 / 10
कच्चे दूध त्वचेला लावले तर ते त्वचेला अतिनील किरणांच्या प्रभावापासून वाचवण्याचे काम करते. दूध आपल्या त्वचेमधील जळजळ कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे.
8 / 10
कच्चे दूध त्वचेला लावा आणि एक तास ठेवा. यामुळे त्वचेवरील टॅनची समस्या दूर जाण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये टॅनची समस्या अधिक असते.
9 / 10
जर कच्च्या दुधात मध मिसळून लावले तर ते त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासोबत डाग दूर करण्याचे काम करते, परंतु ते लावल्यानंतर तुम्हाला काही वेळ चेहऱ्याचा मसाज करावा लागेल.
10 / 10
भर उन्हामध्ये जर तुम्ही बाहेरून आला आणि त्वचा गरम वाटत असेल तर त्वचेवर गुलाब पाणी आणि दूध मिक्स करून लावा. यामुळे आपली त्वचा थंड पडण्यास मदत होईल.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)