Tips for Instant Glow : ‘हे’ घटक दह्यामध्ये मिसळून चेहऱ्याला लावा, फेशियलसारखी चमक येईल!
जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर झटपट चमक हवी असेल तर एका वाडग्यात दीड चमचे दही, एक चमचा तांदळाचे पीठ, कॉफी पावडर आणि एक चमचा मध मिसळा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहऱ्या धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.
1 / 4

2 / 4
दही आणि मुलतानी माती फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा दही, दोन चमचे मुलतानी माती, एक चिमूटभर हळद आणि आवश्यकतेनुसार गुलाबपाणी मिसळा. 10-15 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.
3 / 4
पिंपल्सचा खूप त्रास होत असेल तर दही आणि दालचिनीचा पॅक लावा. यासाठी, दोन चमचे दही घ्या आणि एक चमचा मध आणि दालचिनी पावडर मिसळा. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. यानंतर, आपला चेहरा धुवा आणि मॉइश्चरायझर लावा.
4 / 4
दही आणि बेसन या अशा गोष्टी आहेत. ज्या तुम्ही कधी ना कधी वापरल्याच असतील. तेलकट त्वचेसाठी हा पॅक फायदेशीर आहे. हे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि चेहरा चमकदार बनवते. ते तयार करण्यासाठी, एका वाटीत एक चमचा दही, दोन चमचे बेसन, 4-5 थेंब लिंबाचा रस, एक चमचा गुलाबपाणी मिसळा. सर्व गोष्टी मिसळल्यानंतर चेहऱ्यावर लावा. सुमारे 20 मिनिटांनी चेहरा धुवा.