Muskmelon | आरोग्यापासून ते त्वचेपर्यंत हे फळ अत्यंत फायदेशीर, उन्हाळ्याच्या हंगामात नक्कीच आहारात समावेश करा!
खरबूजचा आहारामध्ये समावेश केल्याने अनेक रोग आपल्यापासून चार हात दूर राहतात. खरबूज हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. खरबूजमध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. अशावेळी आपण खरबुजचे सेवन करायला हवे.
1 / 6
उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहणे अत्यंत फायदेशीर आहे. या हंगामात फक्त आरोग्याचीच नाही तर त्वचा आणि केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात मुबलक प्रमाण पाणी असलेल्या फळांचा आहारामध्ये समावेश करावा. उन्हाळ्यामध्ये बाजारपेठेत खरबूज हे फळ सहज मिळते. तसेच या फळांचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
2 / 6
खरबूजचा आहारामध्ये समावेश केल्याने अनेक रोग आपल्यापासून चार हात दूर राहतात. खरबूज हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. खरबूजमध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
3 / 6
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. अशावेळी आपण खरबुजचे सेवन करायला हवे. यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. खरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते. यामुळेच खरबूज आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
4 / 6
आपल्याला जाणून आर्श्चय वाटेल मात्र, खरबूज आपल्या त्वचेसाठीही प्रचंड फायदेशीर आहे. खरबूज त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. खरबूजमध्ये कोलेजनचे प्रमाणात चांगले असल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
5 / 6
खरबूजमध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन सी जास्त असते. यामुळे खरबूजा आहारामध्ये समावेश करावा. खरबूजमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
6 / 6
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आपण खरबूजचा फेसपॅक वापरू शकतो. यासाठी चार चमचे खरबूजचा ताजा गर घ्या. त्यानंतर त्यामध्ये दूध आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. यामुळे त्वचेवरील काळोखा आणि टॅन जाण्यास मदत होईल.