Health | पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांपासून दूर राहायचंय? मग, ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
पावसाळ्याच्या काळात होणारे सर्वात मोठे आजार म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया आहे, जे भारतातील लाखो लोकांना प्रभावित करतात. हा आजार एडीस इजिप्ती नावाच्या डासाने पसरतो. हा डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूला जमा झालेल्या स्वच्छ पाण्यातूनच पसरतो.
1 / 7
Dengue
2 / 7
सूर्यास्तापूर्वी खिडक्या आणि दारे बंद करा : जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडतो, जेणेकरून आपण पावसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकू. परंतु हे लक्षात ठेवा की, सूर्यास्तापूर्वी किंवा दिवस संपण्यापूर्वी घराच्या सर्व खिडक्या आणि दारे बंद करा. कारण, असे दिसून आले आहे की, डास सामान्यतः सूर्यास्ताच्या दरम्यान आणि नंतर अधिक सक्रिय असतात.
3 / 7
शरीर झाकणारे कपडे घाला : एडीस इजिप्ती डास कोणत्याही वेळी हल्ला करू शकतो, त्यामुळे नेहमी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही घरी असाल किंवा बाहेर, तुमचे शरीर कपड्यांनी शक्य तितके झाकून ठेवा. यासाठी पूर्ण बाहीचा शर्ट, कुर्ता, पँट, पायजामा इ. तसेच लहान मुलांना देखील पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालावेत. जितके जास्त शरीर झाकले जाईल, तितके आपण डासांपासून सुरक्षित राहू शकतो.
4 / 7
झोपताना मच्छरदाणी वापरा : पावसाळ्यात पाणी ठिकठिकाणी जमा होते, ज्यामुळे डासांची पैदासही होते. अशावेळी मच्छरांचा उपद्रव टाळण्यासाठी नेहमी मच्छरदाणी वापरावी. डास आणि इतर किड्यांमुळे होणारे रोग टाळण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे. यामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहतील.
5 / 7
आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवा : माणूस स्वतःला स्वच्छ ठेवतो मात्र, आपला परिसर स्वच्छ ठेवेणे विसरतो. विषाणूजन्य रोग टाळण्यासाठी, आपण स्वतः तसेच आपले घर स्वच्छ करणे अतिशय महत्वाचे आहे. आजूबाजूला पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या. जर घरात कुलरमध्ये किंवा टेरेसवर कुठेतरी पाणी जमा होत असेल, तर ते नियमितपणे स्वच्छ करा. तसेच, आपल्या आजूबाजूला नियमित औषध फवारणी करा.
6 / 7
आहाराकडे लक्ष द्या : रोग कोणताही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यास त्याचा जास्तीत जास्त परिणाम दिसून येतो. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याकडे लक्ष द्या. यासाठी पौष्टिक पदार्थ खा. ताजी फळे आणि भाज्या आहारात जास्त असाव्यात. यासह, आपण भरपूर पाणी देखील प्यावे.
7 / 7
आरोग्य विमा योजना देखील आवश्यक : वेक्टर जनित विषाणूजन्य रोग जसे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया दरवर्षी पावसाळ्यात पसरतात. त्यांचा प्रभाव गावांमध्ये तसेच लहान-मोठ्या शहरांमध्ये दिसून येतो. हा रोग मोठा आहे, म्हणून आपल्याला अधिक सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे. वर नमूद केलेल्या टिप्स तुम्हाला खूप मदत करतील. या व्यतिरिक्त, आजार झाल्यास आपण आपल्यासोबत एखादा आरोग्य विमा योजना ठेवणे आवश्यक आहे.