Hair | केसांसाठी भाताचे पाणी का मानले जाते फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे…
भाताचे पाणी हे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासही मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना भाताचे पाणी लावा. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. 1 कप तांदूळ 2 कप पाण्यात भिजवून घ्या आणि सुमारे एक तासानंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा, जेव्हा तांदळाचे पाणी चिकट होऊ लागते, तेव्हा हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा.