Skin Care Tips : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!
केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्यांची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.
1 / 5
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे त्वचेसाठी घरगुती उपचार करताना आपल्याला जास्त वेळ आणि पैसे देखील लागत नाहीत.
2 / 5
केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्यांची चांगली पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा.
3 / 5
बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या. सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
4 / 5
एक चमचा ताज्या लिंबाचा रस आणि दोन चमचे मध घ्या. एकत्र मिसळा आणि चेहऱ्यावर तसेच मानेवर मिश्रण लावा. 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.
5 / 5
पपईचा लगदा तयार करण्यासाठी त्यात एक चमचा ताज्या लिंबाचा रस घालून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. त्यानंतर काही वेळ ठेवा आणि चेहऱ्याचा मसाज करा. 15-20 मिनिटांसाठी त्वचेवर सोडा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.