Skin Care Tips : सोयाबीनचे तेल त्वचेला लावा आणि ‘या’ समस्या दूर करा!
उन्हाळ्याच्या हंगामात टॅनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. सोयाबीनच्या तेलामध्ये असलेल्या फॅटी अॅसिडमुळे तुम्ही त्वचेला हायड्रेट ठेवू शकता. यासाठी तुम्हाला तेलाचे काही थेंब त्वचेवर लावावे लागतील आणि रात्री झोपण्यापूर्वी काही सेकंद मसाज करा. यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. वाढते प्रदूषण आणि उष्णतेमुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी होऊ शकते.