Skin Care Tips : निरोगी त्वचेसाठी ‘हे’ सुपरफूड वापरा आणि त्वचेवर ग्लो मिळवा!

| Updated on: Feb 09, 2022 | 6:30 AM

सुपरफूड्स फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. ते जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, एन्झाईम्ससारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तुम्ही त्वचेसाठी टोमॅटो, फळे आणि पपई यासारखे सुपरफूड वापरू शकता. तुम्ही त्यांचा वापर फेस मास्क, फेस स्क्रब आणि टोनर म्हणून करू शकता.

1 / 5
सुपरफूड्स फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. ते जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, एन्झाईम्ससारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तुम्ही त्वचेसाठी टोमॅटो, फळे आणि पपई यासारखे सुपरफूड वापरू शकता. तुम्ही त्यांचा वापर फेस मास्क, फेस स्क्रब आणि टोनर म्हणून करू शकता. ते कशाप्रकारे करायचे हे जाणून घेऊयात.

2 / 5
पपई हे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये पपई मॅश करा. त्यात एक चमचा मध घालून चेहऱ्याला लावा. हा फेस मास्क तुमची त्वचा ताजी आणि मुलायम ठेवण्यास मदत करेल.

3 / 5
एक चमचा टोमॅटोचा गर घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट चांगली तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे आपला चेहरा चमकदार आणि तजेलदार होण्यास मदत होते.

4 / 5
कॉफीमध्ये साखर मिक्स करा आणि स्क्रब तयार करा. या खास स्क्रबमुळे आपल्या चेहऱ्यावरील कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
मधामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिक्स करा. त्यानंतर त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर काही वेळ ठेवा. मात्र, जर तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर हा पॅक लावू नका. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)