पिवळ्या रंगाच्या साडीत फुलून दिसेत तुमचं सौंदर्य, अभिनेत्रींचा खास लूक करा फॉलो
कोणत्याही कार्यक्रमात अनेक महिला आणि तरुणी साडीला प्राधान्य देतात. पारंपरिक कार्यक्रम, लग्न, हळदी... इत्यादी आनंदाच्या क्षण आपण सुंदर दिसायला हवं.. अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते... बॉलिवूड अभिनेत्रींचे काही लूक तुम्ही नक्की फॉलो करु शकता...
1 / 5
अभिनेत्री पूजा हेगडे हिचा पिवळ्या साडीतील लूक तुम्ही नक्की फॉलो करु शकता.. पिवळी साडी, साधा मेकअप आणि मोकळ्या केस सोडल्यास अभिनेत्री प्रमाणे तुमचं देखील सौंदर्य फूलून दिसेल.
2 / 5
अभिनेत्री कतरिना कैफ हिला पिवळ्या साडीतील लूक देखील तुम्ही फॉलो करु शकता.. कतरिना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.. तर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही कतरिना हिचा खास लूक फॉलो करु शकता.
3 / 5
सारा अली खानचा पिवळ्या साडीतील लूक खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या साडीमध्ये लाइट प्रिंटही देण्यात आली आहे. अभिनेत्रीने साडीसोबत पिवळ्या बांगड्या घातल्या आहेत. कपाळावर असलेल्या टिकलीमुळे अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
4 / 5
साऊथ स्टार रश्मिका मंदान्नाचा हिला पिवळा लूक पूजा आउटफिटसाठी देखील योग्य आहे. तिच्या साडीवर फ्लोरल प्रिंट्स आहेत. रश्मिकाने साडीसोबत कमीत कमी सोन्याचे दागिने घातले आहेत. अभिनेत्रीने अर्धे केस बांधले आहेत.
5 / 5
कोणत्याही पारंपारिक कार्यक्रमासाठी तुम्ही दिया मिर्झाचा पिवळ्या साडीतील लूक फॉलो करु शकता. तिच्या लिनेन साडीला चेक्स डिझाइन आहे, ज्यामध्ये तिने स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. अभिनेत्रीने साडीवर हातात सिलव्हर रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.