Monsoon Skin Diet : पावसाळ्यात हेल्दी त्वचेसाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा
पावसाळ्याच्या हंगामात बाजारात आपल्याला चांगली आणि ताजी फळे मिळतात. या फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. पावसाळ्यात आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या काही फळांचा समावेश करू शकता.
1 / 5
पावसाळ्याच्या हंगामात बाजारात आपल्याला चांगली आणि ताजी फळे मिळतात. या फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. पावसाळ्यात आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या काही फळांचा समावेश करू शकता. जसे लीची, नाशपाती, बेरी जांभूळ ही फळे आहारात घेतल्याने आपली त्वचा देखील चांगली राहते.
2 / 5
बाहेर मस्त पाऊस पडत असल्यावर आपल्याला काही तरी चकमकीत आणि तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. पावसाळ्यात आहारातमध्ये जास्त तेलकट पदार्थांचा समावेश केला जातो. यामुळे आपली त्वचा कोरडी आणि चेहऱ्यावरील चमक कमी होण्याची शक्यता असते.
3 / 5
पावसाळ्यात आपण जास्त पाणी पिणे टाळतो. मात्र, असे करणे चुकीचे आहे. पावसाळ्यात देखील आपण पुरेसे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. त्वचा चांगली ठेवण्यासाठी ताजे रस, ग्रीन टी आणि सूप देखील पिऊ शकता.
4 / 5
सूर्यफूलाच्या बिया आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. सूर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे आपली त्वचा तरूण आणि चमकदार बनविण्यात मदत करते. आहारात सूर्यफूलाच्या बियांचा समावेश केला पाहिजे. मात्र, त्याचे प्रमाण कमी असावे.
5 / 5
काय होईल जर तुम्ही 30 दिवस गोड नाही खाल्लं?