Skin Care : स्ट्रॉबेरी ‘हे’ 4 फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!
स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे त्वचेसाठी स्ट्रॉबेरी अत्यंत फायदेशीर आहे. आपण घरच्या-घरी स्ट्रॉबेरीचे काही फेसपॅक तयार करू शकतो.
1 / 5

2 / 5
स्ट्रॉबेरीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉबेरीची पेस्ट दोन चमचे आणि तीन चमचे दूध लागणार आहे. स्ट्रॉबेरीची पेस्ट आणि दूध चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी ही पेस्ट थंड पाण्याने धुवा.
3 / 5
स्ट्रॉबेरी आणि दह्याचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी दोन चमचे दही आणि दोन चमचे स्ट्रॉबेरीची पेस्ट घ्या. दोन्ही घटक एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
4 / 5
स्ट्रॉबेरी खाणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा अधिक सुंदर आणि तरूण दिसते म्हणून ज्यांना त्वचेच्या काही समस्या असतील तर त्यांनी देखील स्ट्रॉबेरी खाणे चांगले आहे. ज्यांना चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा समस्या आहेत.
5 / 5
स्ट्रॉबेरीच्या पेस्टमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)