निकसोबत डेटवर असताना प्रियांका चोप्राने कॅरी केले इतके महाग जॅकेट, किंमत वाचून थक्क व्हाल!
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकेत परतली आहे. अॅमेझॉन प्राइम सीरीज 'सिटाडेल'चे स्पेन शेड्यूल पूर्ण करून अभिनेत्री अमेरिकेत परतली. प्रियांका लॉस एंजेलिसमध्ये निकसोबत डेटवर गेली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्रियांकाने यावेळी स्किनी डेनिमसह ऑल-स्टेपल अमेरिकन वर्सिटी जॅकेट परिधान केले होते.