PHOTO : पावसाळ्याच्या हंगामात केसांची काळजी ‘या’ पध्दतीने घ्या, वाचा!
पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याबरोबरच केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या हंगामात केस आणि त्वचा संबंधित समस्या वाढतात. या हंगामात केस गळती अधिक होण्याची शक्यता असते. कारण या हंगामात जास्त आर्द्रतेमुळे केस तुटू लागतात.
1 / 5

2 / 5
केस स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अँटी-बॅक्टेरिया शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. कारण यावेळी बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. शॅम्पूनंतर कंडिशनर आठवणीने लावा.
3 / 5
केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. तेल कोरड्या टाळूचे पोषण करण्याशिवाय हे केस मजबूत आणि चमकदार राहण्यास मदत करते. केस धुण्या अगोदर एक तास अगोदर हलक्या हाताने गरम तेलाने केसांची मालिश करा.
4 / 5
पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल.
5 / 5
केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)