Summer Care : उन्हामुळे या रोगांचा धोका अधिक, वेळीच सर्तक व्हा आणि काळजी घ्या!
उन्हाळ्याच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर गेले की, जीव लाही लाही होतो आहे. उन्हाळ्याच्या हंगामात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. अति उष्णतेमध्ये शरीराचे तापमानही वाढते. या काळात आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि आपल्याला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते.