Thermos : मोठ्या थाटात आपण ‘थर्मास’ म्हणतो, पण ‘त्या’ बॉटलला आहे ‘हे’ नाव !
उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे.
1 / 5
'थर्मास' नावाची वस्तू आपल्या सगळ्यांच्या घरात असते. थंड पाणी बराच काळ थंड ठेवण्यासाठी आणि गरम पाणी बराच काळ गरम ठेवण्यासाठी हे थर्मास फेमस आहे. उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे. मग नेमकं याला म्हणतात काय ? जाणून घेऊयात...
2 / 5
थर्मास कंपनी खास प्रकारचे डब्बे आणि बॉटल बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी अमेरिकन असणारी ही कंपनी नंतर जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीला अजूनही कंपन्या जोडलेल्या आहेत पण ही पेरेंट कंपनी आहे.
3 / 5
१८९२ मध्ये स्टोटिश साइंटिस्ट सर जेम्स देवाल ने सगळ्यात आधी थर्मास बनवलं होतं. या विशिष्ट भांड्यात तापमान स्थिर राहावं यासाठी त्यांनी एका केमिकलचा वापर केला होता. प्रयोग करता करता.
4 / 5
१९४२ मध्ये व्हिक्टरी फ्लास्क लि.हा पहिला कारखाना मुंबईत आला. १९४२ च्या आधी थर्मासांची भारतात आयात करण्यात येत होती. १९५५-५६ या काळात मद्रास आणि मुंबई इथे प्रत्येकी एक एक नवीन कारखाने निघाले. १९७६ मध्ये भारतात सुमारे १२ कारखाने थर्मास निर्मितीत होते.
5 / 5
आता प्रश्न असा पडतो की आतून काच असलेल्या या बॉटलला थर्मास नाही म्हणत तर मग काय म्हणतात ? याला व्हॅक्युम फ्लास्क किंवा फ्लास्क असं म्हटलं जातं.