Skin care tips | उन्हाळ्यात त्वचा थंडगार ठेवण्यासाठी हे फेसपॅक फायदेशीर!
मध, दही आणि गुलाब पाणी एका भांड्यात एकत्र करा. चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हा फेसपॅक खूप फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये हा फेसपॅक नेहमीच त्वचेसाठी वापरावा. मुलतानी माती आणि गुलाब पाणी हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा मुलतानी माती आणि गुलाब पाणी लागेल. ते एकत्र मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा.