त्वचा, केस आणि शरीराची काळजी ही नेहमीच घेतली गेली पाहिजे. आजकाल बॉडी शेपमध्ये ठेवण्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड याआधीही फॉलो केला जात होता. मात्र, त्याचे प्रमाण खूप कमी होते. लोक जिम जाॅईन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. बहुतेक लोक त्वचा आणि केसांची विशेष काळजी देखील घेतात. या सर्व काळजी घेताना, मात्र, यादरम्यान बहुतेक लोक बिघडलेल्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
तज्ज्ञांच्या मते, अशा अनेक पद्धती आपण अवलंबतो. ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य खराब होते. या पद्धतींचा परिणाम आपल्या आयुष्यावर इतका होतो की त्या आपल्या सवयीचा भागच होतात. या पध्दती नेमक्या कोणत्या आहेत, याबद्ल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
व्यस्त जीवन आणि खराब सवयींमुळे लोकांना कमी झोप घेण्याची एक सवयच लागली आहे. कमी झोपेमुळे मेंदूवर ताण येतो. सुरुवातीला थकवा आणि तणाव असतो, परंतु या चुकीमुळे एखाद्या वेळी नैराश्य येऊ शकते. काही लोकांना अशी सवय असते की ते जास्त फोन वापरतात आणि झोप कमी घेतात. मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे.
मीठ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारणे कोणताच खाद्यपदार्थ मीठाशिवाय चवदार अजिबात लागत नाही. परंतु मीठाच्या अतिवापराने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते मिठाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला बीपीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आजपासूनच मीठ कमी खाण्याची सवय लावा.
आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाला एकटे राहण्याची सवय लागली आहे. मात्र, ही सवय अजिबात चांगली नाहीये. या सवयीमुळे तुम्हाला काही काळ आनंद मिळू शकतो, पण एखाद्या वेळी हा एकटेपणा जीवघेणा देखील ठरू शकतो. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या येऊ लागतात.