Health care tips | सावधान… तुमच्या या वाईट सवयीमुळे वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका!
अल्कोहोल हे देखील ब्रेन स्ट्रोकचे प्रमुख कारण आहे. दिवसातून दोन ग्लासपेक्षा जास्त अल्कोहोल प्यायल्याने उच्च रक्तदाबाची शक्यता खूप वाढते. ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. दिवसभर पडून राहिल्याने, एकाच जागी बराच वेळ बसल्याने लठ्ठपणा वाढतो. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. यामुळे केवळ ब्रेन स्ट्रोकच नाही तर अनेक आजार कमी होतील.