Hair care tips : या सुगंधी फुलांनी तुमचे केस सुंदर बनवा! ते कसे वापरायचे हे जाणून घ्या!

| Updated on: Feb 15, 2022 | 6:30 AM

सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर आहे. जास्वंदाच्या फुलाचे तेल करून आपण केसांना लावू शकतो. गुलाबाच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये याचा समावेश करून तुम्ही केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

1 / 5
सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाचे फुल अत्यंत फायदेशीर आहे. जास्वंदाच्या फुलाचे तेल करून आपण केसांना लावू शकतो.

2 / 5
गुलाबाच्या फुलांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये याचा समावेश करून तुम्ही केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

3 / 5
रोझमेरी फुल देखील केसांसाठी फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी, एका पातेल्यात रोझमेरीची काही फुले पाण्यात मिसळा आणि उकळा. पाण्याचे प्रमाण निम्मे झाल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या. केस धुतल्यानंतर, रोझमेरी पाण्याने टाळू धुवा.

4 / 5
झेंडूच्या फुलांचा वापर केसांसाठी अनेक प्रकारे केला जातो. त्याचा रस किंवा पाकळ्या हेअर पॅकमध्ये मिक्स करून केसांना लावू शकता. निर्जीव केसांसोबतच कोंडा सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील हे गुणकारी मानले जाते.

5 / 5
चमेलीच्या फुलामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे ओलावा प्रदान करण्याचे देखील कार्य करते. तुम्ही खोबरेल तेलात मिसळून केसांना लावू शकता. प्रथम चमेलीची फुले तेलात मिक्स करून गरम करा. 10 मिनिटे तेल गरम केल्यानंतर ते थंड होऊ द्या आणि नंतर टाळूवर चांगले मसाज करा.